
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका ३० एप्रिल रोजी होणार आहे. त्यात बोर्डाची आर्थिक स्थिती ढासळले जात असल्याचे वारंवार बोर्ड प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
Cantonment Board Election : निवडणुकीकरिता सुमारे ५० लाख रु. खर्च अपेक्षित - सीईओ सुब्रत पाल
कँटोन्मेंट - पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका ३० एप्रिल रोजी होणार आहे. त्यात बोर्डाची आर्थिक स्थिती ढासळले जात असल्याचे वारंवार बोर्ड प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकांकरिता येणारा लाखोंचा खर्च बोर्ड कुठल्या स्तरावर व्यवस्थापित करेल हा प्रश्न नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे. यावर सुमारे ५० लाख रुपयांच्या आसपास निवडणुकांकरिता खर्च होण्याची शक्यता बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी वर्तविली आहे.
निवडणुकीकरिता राज्य व केंद्राकडून निधी उपलब्ध होत असतो. मात्र या निवडणुका झाल्यावर हा निधी बोर्डाला उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून अद्याप बोर्डाला ५५० कोटी रुपयांचा जीएसटीचा वाटा मिळालेला नाही. बोर्डाच्या नागरिक समस्या, विकासकामे आदी छोट्या मोठ्या प्रकल्पाकरिता पैसे नसल्याच्या कारणांमुळे रखडले गेले आहे. त्यामुळे काही वर्षांपासून बोर्ड प्रशासन यावाट्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यात निवडणुकांचा भार आल्याने परिस्थिती कशीही असो, केंद्राच्या आदेशाप्रमाणे सूचनांचे पालन तर करावेच लागणार असल्याचे सीईओ यांनी सांगितले.
बोर्डाच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. येथे महसुल गोळा करण्याची साधने ही कमी आहेत. मात्र मालमत्ता कर आकारणी मनपाच्या तुलनेत येथे दुप्पटीने आकारले जाते. अद्याप बोर्डाच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. हे अजूनही बोर्ड प्रशासनाकडून स्पष्ट झाले नाही. यावर बोर्डाचे सीईओ यांनी ही अधिक भाष्य करताना टाळले आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील बोर्डाचा वार्षिक ताळेबंद झाल्याशिवाय हे प्रश्न अनुत्तरित असणार आहे.