इंदापूर तालुक्यातील 4 रस्त्यांच्या कामासाठी 50  लाखाचा निधी मंजूर - प्रवीण माने 

आदम पठाण
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

वडापुरी - बांधकाम विभाग (दक्षिण) जिल्हा परिषद पुणे मार्फत इंदापूर तालुक्यातील डांबरी रस्ते करण्यासाठी 50 लाखाच्या चार कामांना मंजुरी मिळाली असल्याची पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी माहिती दिली. 

वडापुरी - बांधकाम विभाग (दक्षिण) जिल्हा परिषद पुणे मार्फत इंदापूर तालुक्यातील डांबरी रस्ते करण्यासाठी 50 लाखाच्या चार कामांना मंजुरी मिळाली असल्याची पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी माहिती दिली. 

इंदापूर तालुक्यातील चार रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळालेली गावे पुढीलप्रमाणे, वरकुटे बु ते भैरवनाथ मंदीर 12 लाख, गंगावळण ते भारत बोंगानेवस्ती रस्ता 20 लाख, कळस जंक्शन बिरंगुटवाडी रस्ता दुरुस्ती ग्रा.मा 75- 10 लाख, काळेवाडी नंबर 2 ते मचिंद्र काळे वस्ती ग्रा.मा 31- 8 लाख अश्या 4 रस्त्यांच्या कामासाठी 50 लाखाच्या कामाला मंजुरी मिळाली. लवकरच कामे पूर्ण होणार असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.

माने पुढे म्हणाले की, दळण वळणाच्या दृष्टीने गावातील रस्ते सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती त्यामुळे वाहतूकीला सारखा अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या रस्त्यांच्या मागणीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच रस्त्यांच्या कामाला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्ते व पूल दुरुस्ती व परिक्षण कार्यक्रमा नुसार जिल्हा परिषद स्तरावर  या परिसरातील रस्ते वाहतूकीयोग्य सुस्थितीत असावे तसेच हे रस्ते सर्वसाधारण दुरुस्ती स्वरुपाची असल्याचे प्रवीण माने म्हणाले. माने पुढे म्हणाले कि मंजुर झालेल्या  कामाची त्रयस्थ यंत्रने मार्फत कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे होणारी कामे दर्जेदार व पारदर्शकपणे होणार आहे. या भागातील असलेली समस्या दूर होणार आहे. काम पारदर्शक पणे होते की नाही यासाठी जनतेने जागरुक रहावे असे आवाहन प्रवीण माने यांनी केले आहे.

Web Title: 50 lakhs of funds will be approved for the work of Indapur taluka