

Citizens' forum alleges 25 potholes found within 50 meters despite Pune Municipal Corporation claiming only 54 potholes citywide
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाने शहरात केवळ ५४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला असताना, सजग नागरिक मंचाने अवघ्या ५० मीटरच्या पट्ट्यात २५ खड्डे दाखवून या दाव्याची पोलखोल केली आहे. महापालिका प्रशासनाचा हा दावा म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका मंचाने केली आहे.