
पुणे - दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला डेंगळे पुलालगत मोठ्याप्रमाणात अनधिकृत झोपड्या टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यावर महापालिकेच्या परिमंडळ दोन तर्फे भल्या सकाळी सहा वाजता कारवाई करून ५० पेक्षा जास्त झोपड्या काढून टाकल्याने. तसेच कोथरूडमधील सुतारदरा भागात कारवाई करून अतिक्रमण काढून टाकून रस्ते मोकळे केले आहेत.