पुणे जिल्ह्यात आत्ताच टॅंकरची पन्नाशी

Tanker
Tanker

भवानीनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 3 टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्याच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यात भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे.

संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस पडत असताना पुणे जिल्ह्यात मात्र पूर्वेकडच्या भागात पावसाची अजूनही पाठच आहे. त्यामुळे खरीप धोक्‍यात आला असून पिकांसह गावेही तहानलेली आहेत. बारामती तालुक्‍यात सर्वाधिक 15 टॅंकर सुरू असून 15 गावे व 145 वाड्या तहानलेल्या आहेत. इंदापूर तालुक्‍यात 14 टॅंकर सुरू असून 12 गावे व 58 वाड्यांतील 32 हजार 819 लोकांना पाणी पुरवले जात आहे. दौंड तालुक्‍यात 9 टॅंकरने 7 गावे व 50 वाड्यांना तर पुरंदर तालुक्‍यात 5 गावे व 64 वाड्यांना 11 टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. या चार तालुक्‍यांमध्येच सध्या टॅंकर सुरू असून एक लाख लोकांना हे पाणी पुरवले जात आहे. याखेरीज आंबेगाव तालुक्‍यातही 1 गाव व 7 वाड्यांतील 831 लोकांना एका टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

मागील वर्षीपेक्षा भीषण स्थिती
मागील वर्षी 1 सप्टेंबर 2018 पर्यंत जिल्ह्यातील फक्त बारामती, इंदापूर व दौंड तालुक्‍यात पाच टॅंकर सुरू होते. 4 गावे व 36 वाड्यांना हे पाणी सुरू होते, 14 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत ही संख्या 9 टॅंकरवर पोचली होती. मात्र, यंदा ऐन पावसाळ्यातच ही स्थिती दहा पटीने भीषण बनली आहे. त्याचा विचार करता येणारा उन्हाळा या पूर्वेकडील भागात किती भीषण बनू शकतो याचा प्रत्यय येऊ लागला आहे. 14 ऑक्‍टोबर 2014 रोजी पुणे जिल्ह्यातही नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com