
पुणे : शहरातील विविध शाळांमध्ये योगासन व प्राणायामाचे महत्त्व सांगत तसेच प्रात्यक्षिके सादर करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाजीराव रस्त्यावरील नुमवितील विद्यार्थ्यांकरिता साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि वीर शिवराज मंडळाच्या संयुक्त विद्यमाने योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यात विद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेचे माजी विद्यार्थी योगगुरू विठ्ठल कडू यांच्यासह त्यांची मुले नारायणी कडू (वय १०) आणि सिद्धेश कडू (वय १५) यांनी अवघड आसने सादर केली. यावेळी आमदार हेमंत रासने, नूमवि प्रशाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपमुख्याध्यापिका संगीता काळे, लालबहादूर जगताप आदी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा व मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल यांनी संयोजन केले होते.