बारामती - येथील परिसरात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा सापडतात याचं एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. .तालुक्यातील झारगडवाडी येथील राजाराम राऊत यांना आपल्या शेतात एक नाणे सापडले. यावरील मजकूर समजत नसल्याने त्यांनी अधिक माहितीसाठी भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या मनोज कुंभार व विनोद खटके यांच्याशी संपर्क साधला होता.काही दिवसांतच अभ्यासकांच्या मदतीने 15 व्या शतकातील या नाण्याचा इतिहास समोर आला आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या अभ्यासातून यावरील मजकुराची उकल झाली असून संस्थेचे सदस्य शिलालेख वाचक अनिल दुधाणे यांनी याकामी सहकार्य केले..असा आहे नाण्यावरील मजकूरअहमद शाह बहमनी द्वितीय (इ.स. 1435–1457) हा बहमनी सुलतानातील नववा शासक होता. धार्मिक वृत्तीचा असल्याने त्याला 'अहमद शाह वली' अशी उपाधी लाभली. त्याने गुलबर्गा येथून राजधानी बिदर येथे हलवून ती स्थिर केली. त्याच्या कारकीर्दीत तांब्याची फालूस नाणी मोठ्या प्रमाणावर प्रचलनात आली..ही नाणी सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जात असून आकाराने साधारण 15 ग्रॅम वजनाची असत. नाण्यांच्या समोरच्या भागावर अल-सुलतान अहमद शाह अल-वली अल-बहमनी अशी नोंद असते, तर मागील भागावर धार्मिक लेख दिसतात. काही बिदर ही त्याच्या काळातील प्रमुख टाकसाळ असून काही नाणी गुलबर्ग्यातूनही निघाली. या तांब्याच्या नाण्यांतून खालील धार्मिक लेखाचा अर्थ स्पष्ट होत आहे..अल मु तासिम बी हैल अल्लाह अल मन्नान साम्मी खलील अल रेहमान अबुल मुझफ्फर असा राजा जो अल्लाहची ताकद ठेवतो, जो करुणामय आहे. असा जो दयाळू अल्लाहचा मित्र आहे. उदार अल्लाहचा सेवक आहे. यावरून सुलतानाची आर्थिक व धार्मिक धोरणे स्पष्ट दिसून येतात. नाण्याचे वजन 15 ग्राम असून त्याचा दोन से.मी. गोल आकार असून हे नाणे तांबे या धातूचे आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.