पिंपळवंडी - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पुणे -नाशिक महामार्गाच्या पूर्वेला मीना नदीकिनारी असलेल्या मुंजोबा महादेव मंदिरात एका शिळेवर शिलालेख कोरलेला आहे. तो देवनागरी लिपीत कोरला आहे. त्यामध्ये काही शब्द संस्कृतमधील आहेत. लेखाची शिळा आयताकृती असून, ही कोरलेली अक्षरे एकसारखी आहेत.