दिलासादायक : पुण्यात 522 जण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

शहरात 9 मार्चपासून आतापर्यंत 17 हजार 228 कोरोनाबाधित आढळले आहेत.त्यापैकी 10 हजार 451 रुग्णांवर उपचार करण्यात यश आले.त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांमधून सहा हजार 134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 486 नवीन रुग्णांचे मंगळवारी (ता. 30) निदान झाले असले तरीही त्यापेक्षा जास्त म्हणजे 522 कोरोनामुक्त खडखडीत बरे होऊन घरी गेले. मात्र, त्याच वेळी शहरातील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचे प्राण कोरोनाने घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात 9 मार्चपासून आतापर्यंत 17 हजार 228 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 10 हजार 451 रुग्णांवर उपचार करण्यात यश आले. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांमधून सहा हजार 134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान 30 मार्चपासून आतापर्यंत 643 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेने दिली. 
शहरात कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांचे जानेवारीपासून नमुने तपासण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये एक लाख 15 हजार 990 जणांचे नमुने तपासले. त्यापैकी 9 टक्के रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

संसर्ग झालेले 59 रुग्ण विविध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत; तर 291 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 522 people corona free in Pune city