Uruli Kanchan Accident : वळती येथील ५६ वर्षीय शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच मृत्यू

शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करत असताना अचानक तालीवरून ट्रॅक्टर उलटल्याने खाली चिरडून एका ५६ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
sopan kunjir

sopan kunjir

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करत असताना अचानक तालीवरून ट्रॅक्टर उलटल्याने खाली चिरडून एका ५६ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वळती, ता. हवेली येथे घडली आहे. सोपान केरू कुंजीर (वय-५६ वर्ष, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ०४) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वळती गावच्या हद्दीतील स्वतःच्या शेतात काम करत असताना हा भीषण अपघात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com