Pune News : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणूका रद्द

पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणूका संरक्षण मंत्रालयाने आज रद्द केल्या
57 Elections boards cancelled across country including Pune Cantonment Board politics
57 Elections boards cancelled across country including Pune Cantonment Board politicsesakal

घोरपडी : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणूका संरक्षण मंत्रालयाने आज रद्द केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या राजपत्रानुसार आजपासून १७ मार्च पासून निवडणूकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

57 Elections boards cancelled across country including Pune Cantonment Board politics
Pune Crime : औंधमधील ते हत्याकांड व्यवसायात तोटा झाल्यामुळे

याबाबत पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम ४१ च्या आधारे ही ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत १८ फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती.

57 Elections boards cancelled across country including Pune Cantonment Board politics
Pune University : सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात एकूण ६२ कॅन्टोन्मेंट आहेत. त्यातील ५७ च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आदेश जरी करून पुढील आदेश येतीपर्यंत या निवडणुका स्थगिती दिली आहे.याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी सांगितले "केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका रद्द केल्या असून अधिकाऱ्याच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली आहे. याबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com