esakal | पुणे जिल्ह्यात दिवसात ५७३ नवे कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

पुणे जिल्ह्यात दिवसात ५७३ नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.२) दिवसभरात ५७३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसात ६५२ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील १७१ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत पिंपरी चिंचवडमधील ९९ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २४७, नगरपालिका हद्दीतील ४४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १२ रुग्णांचा समावेश आहे.

आज दिवसभरात पुणे शहरातील १३१, पिंपरी चिंचवडमधील ८१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६०, नगरपालिका हद्दीतील ७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत.

loading image
go to top