esakal | भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज
sakal

बोलून बातमी शोधा

58 percent coronavirus patients recovered Pune city

पुण्यात  आhttps://www.esakal.com/pune/big-decision-regarding-wari-meeting-deputy-chief-minister-ajit-pawar-299647तापर्यंत सुमारे 47 हजार 761 नागरिकांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यातील 6 हजार 93 लोकांना कोरोना झाला होता.

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : आधी कोरोनाला घाबरलेल्या पुणेकरांनी आता या आजाराला हरविल्याचे आशादायी चित्र असून, कोरोना झालेल्यांपैकी सुमारे 58 टक्के रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर, मृतांची टक्केवारी काहीशी घटून साडेपाचवरून ती पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात शुक्रवारी नव्या 242 रुग्णांची भर पडली; मात्र 186 रुग्ण ठणठणीत झाल्याने आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु, या दिवसभरात आणखी दहा जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 303 झाली आहे. दुसरीकडे मात्र विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 166 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 45 जण व्हेंटिलेटवर आहेत. परंतु, गेल्या काही व्हेंटिलेटरवरील रुग्णही बरे झाल्याचे दिसून आले आहे. मृतांमध्ये सर्वजण 50 पेक्षा अधिक वयाचे आहेत.

आणखी वाचा - पुण्यातली रस्त्यांची कामे...अधिकारी आणि अजित पवार

येरवड्यातील 65 वर्षांच्या महिलेला कोरोना झाल्याने 19 मेला उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या महिलेला क्षयरोग होता. गंजपेठेतील 56 वर्षाच्या पुरुषाचाही मृत्यू झाला असून, त्यांच्यावर 8 मेपासून उपचार सुरू होते. त्यांना उच्चरक्तदाब, मधुमेह होता. पांडवनगरीमधील 56 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांना उच्चरक्तदाब असल्याचेही निदान झाले आहे. गोखलेनगरमधील 87 वर्षांच्या महिलेला कोरोना झाल्याने त्या 17 मेपासून रुग्णालयात होत्या. त्यांना शुक्रवारी मृत्यू झाला.

आणखी वाचा - आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द 

शहरात आतापर्यंत सुमारे 47 हजार 761 नागरिकांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यातील 6 हजार 93 लोकांना कोरोना झाला होता. मात्र, आतापर्यंत 3 हजार 450 रुग्ण बरे झाले असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तर 303 रुग्णांचा मृत्यू झाल्याने हे प्रमाण 5 टक्के आहे. याआधी हे प्रमाण साडेपाच टक्‍क्‍यांपर्यंत होते. सध्या महापालिकेसह खासगी रुग्णालयांत 2 हजार 340 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 179 नागरिकांची तपासणी झाली आहे.

loading image