
पिंपरी : ‘‘जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून, आत्मिक उन्नतीमध्ये आहे,’’ असे मत निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समारोपाच्या दिवशी (रविवारी) भाविकांना त्यांनी जीवनाचा मूलमंत्र दिला. डेअरी फार्म मिलिटरी 450 एकर मैदानात पार पडलेल्या या सोहळ्याला देश-विदेशातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती.