
प्रदीप लोखंडे
पिंपरी : पिरंगुट औद्योगिक क्षेत्र तसेच त्याला लागून असलेल्या रहिवासी भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने सहा रस्ते विकास प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रस्तावित रस्त्यांमुळे औद्योगिक उत्पादनाला वेग येणार आहे, तसेच स्थानिक लोकांना व उद्योजकांना सहजगत्या वाहतुकीची सुविधा मिळणार आहे.