esakal | पुणे : फुटपाथवरून अपहरण करून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : फुटपाथवरून अपहरण करून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पुणे : फुटपाथवरून अपहरण करून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मित्राला भेटण्यासाठी बिहारला निघालेल्या १४ वर्षीय मुलीचे मदतीच्या बहाण्याने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून रिक्षातून अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असताना बलात्काराचा आणखी एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.पुणे स्टेशन एसटी स्थानकासमोरील फुटपाथवर आपल्या कुटुंबीयांसमवेत झोपलेल्या सहा वर्षांच्या मुलीचे रिक्षातून अपहरण करून तिच्यावर एका रिक्षाचालकाने बलात्कार केला आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

सागर मारुती मांढरे (वय ३९, रा. दुगड चाळ, सच्चाईमाता मंदिराच्या मागे, कात्रज, मुळ रा. भोर) असे अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही तिच्या कुटुंबीयांसमवेत बुधवारी (ता. ९) रात्री पुणे स्टेशन एसटी स्थानकासमोरील फुटपाथवर झोपली होती. त्याचवेळी मांढरे हा त्याची रिक्षा घेऊन तेथे आला. त्याने जबरदस्तीने फिर्यादी यांच्या मुलीला रिक्षात बसवले. त्यानंतर तिला सातारा रस्त्यावर असलेल्या सोमशंकर चेंबर्समध्ये तिसरा मजल्यावर नेले. त्यांनतर तिथे तिच्यावर बलात्कार केला. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

loading image
go to top