Pune News : समाविष्ट गावांसाठी बांधकाम परवानग्यांना ६० दिवसांची मर्यादा; नगरविकास विभागाचे आदेश

पुणे महापालिकेकडे आलेल्या समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगी प्रस्तावांवर ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे दिले स्पष्ट आदेश.
Building Construction

Building Construction

sakal

Updated on

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महापालिकेकडे आलेल्या समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगी प्रस्तावांवर ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. राज्य शासनाच्या अधिसूचनेच्या तारखेपासून हा कालावधी मोजला जाणार असल्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या बांधकाम परवानग्यांना आता गती मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com