
समाधान काटे
शिवाजीनगर : “छत कधीही कोसळेल, विजेचा धक्का बसेल किंवा घरात साप, विंचू शिरून दंश करेल, याची आता खात्री राहिली नाही. आम्ही शहर स्वच्छ ठेवतो, पण आम्हालाच दुर्गंधीत राहावे लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी फक्त मतदानाच्या वेळी येतात, घरे बांधून देण्याचे आश्वासन देतात; पण निवडून आल्यानंतर आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात,” अशी व्यथा शिवाजीनगर येथील पांडवनगर पीएमसी वसाहतीतील महापालिकेचे सफाई कर्मचारी सांगत होते.