Pune Rains : खडकवासल्यात अवघ्या तासाभरात पुण्यातील 9 दिवसांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

खडकवासल्यात सव्वा तासात 62 मिलिमीटर पाऊस झाला, असून संध्याकाळी सव्वासहा ते साडे सात वाजेपर्यत सव्वा तासात खडकवासला धरण येथे 62 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

पुणे : पुण्यात 9 दिवसांमध्ये बरसलेल्या पावसाइतकाच पाऊस खडकवासल्यात केवळ तासाभरात कोसळला आहे. पुण्यात 1 ते 9 ऑक्‍टोबर दरम्यान 70.8 मिलमीटर पाऊस पडल्याची नोंद शिवाजीनगर येथील हवामान खात्याच्या वेधशाळेत झाली आहे. मात्र, बुधवारी संध्याकाळी खडकवासला परिसरात तासभर मुसळधार पाऊस पडला. त्यात रात्री साडेसात वाजेपर्यंत 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.

खडकवासल्यात सव्वा तासात 62 मिलिमीटर पाऊस झाला, असून संध्याकाळी सव्वासहा ते साडे सात वाजेपर्यत सव्वा तासात खडकवासला धरण येथे 62 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

खडकवासला धरण येथे सहा वाजेपर्यंत पहाटे 20 मिलिमीटर पाऊस झाला. तर सकाळी सहा वाजल्यानंतर सात मिलिमीटर झाला होता. नांदेड, नांदोशी, धायरी, किरकटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक डोणजे, घेरा सिंहगड, कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर वारजे माळवाडी परिसरात याच वेळी पाऊस झाला. त्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठले होते. काही वेळात ओढ्याला जोरात पुराप्रमाणे पाणी आले. खडकवासला येथील पुलावरील वाहतूक काही वेळ बंद होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62 millimeters of rain in one hour at khadakwasla area