
इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ६२४३ प्रकरणे निकाली निघाली.
इंदापूर लोकअदालतीत ६२४३ प्रकरणे निकाली
इंदापूर - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ६२४३ प्रकरणे निकाली निघाली. पैकी ६६ दिवाणी व फौजदारी तसेच दाखल पूर्व ६१७७ असे एकूण ६२४३ प्रकरणे तडजोडीअंती मिटवण्यात आल्याची माहितीइंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.ल.पाटील यांनी दिली. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एस. कलाल व सौ. स्वानंदी वडगावकर उपस्थित होते.
अदालतीमध्ये अनंत नागरी सहकारी संस्था विरुद्ध छत्रपती सहकारी साखर कारखाना प्रकरणीरक्कम अडीच कोटी रुपयांचा निगोशिएबल इन्स्टुमेंटन्स ऍक्ट खालील चेकचे प्रकरण तडजोडीअंती निकाली निघाले. एड महेश शिंदे व हेमंत नरुटे यांनी याचे यशस्वी कामकाज पाहिले. बळपुडी येथील देवकाते कुटुंबातील सूनबाई विरुद्ध सासूसासरे यांचे कौटुंबिक वादाचे प्रदीर्घ प्रकरण निकाली निघाले. इंदापूर पंचायत समितीने दाखल केलेल्या थकबाकी प्रकरणात १८ लाख ७१ हजार ९४६ रुपयांची थकबाकी वसुली झाली तर घरकुलाची १०८० पैकी २८५ प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्याने अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी अनेक वर्षे विभक्त विवाहित जोडपी, बँक थकीत कर्ज व गहाण खत प्रकरणे,वीज बिला संदर्भातील वादविवाद ,वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या कार्य वाही, कौटुंबिक व भावकी मधील शेतीसंदर्भातील वाटप प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना निगोशिएबल इन्स्टुमेंटन्सऍक्ट कलम १३८च्या खाली दाखल प्रकरणे,बँकवसुली प्रकरणे, वीज व पाणी देयकाबाबतची प्रकरणे, इतर फौजदारी व वैवाहिक प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, नोकरीबाबतचे पगार, इतर भत्ते, निवृत्ती बाबतची प्रकरणे, महसूल प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे तडजोडी अंती निकाली निघाली. यावेळी इंदापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष मनोहर चौधरी, सचिव आशुतोष भोसले, उपाध्यक्ष सुभाष भोंग व जमीर मुलाणी, खजिनदार राजेंद्र ठवरे, महिला प्रतिनिधी प्रिया शिंदे-मखरे, सदस्य रुद्राक्ष मेनसे, कुंडलिक मारकड, तेजसिंह पाटील, विकास देवकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंदापूर वकील संघटनेने विशेष सहकार्य केले.
Web Title: 6243 Cases Settled In Indapur Public Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..