esakal | ६३ वर्षांच्या महिलेचा गुडघाबदलीनंतर ३,५०० किलोमीटर पायी प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Knee Replacement

६३ वर्षांच्या महिलेचा गुडघाबदलीनंतर ३,५०० किलोमीटर पायी प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोन्ही गुडघा बदलीच्या शस्त्रक्रियेनंतर (Knee Surgery) ६३ वर्षांच्या महिलेने (Women) ३,५०० किलोमीटर नर्मदा परिक्रमा पायी (Walking) पूर्ण केली. पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. (63 Year Old Woman Walks 3500 Kilometers after Knee Replacement)

सुलभा कुलकर्णी या २००९ पासून गुडघेदुखीने त्रस्त होत्या. दैनंदिन जीवनातील कामे करताना त्यांना त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना गुडघाबदलीची शस्त्रक्रिया सांगितली होती; परंतु सरकारी कर्मचारी असल्याने आणि घरगुती कामामुळे त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हत्या. २०१५ मध्ये जेव्हा त्या सेवानिवृत्त झाल्या, तेव्हा त्यांना गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागला. म्हणून त्यांनी गुडघाबदलीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. साईश्री हॉस्पिटल येथे रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांच्या नेतृत्वात कुलकर्णी यांच्यावर शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''

सुलभा यांच्या याच सकारात्मक विचारांमुळे त्यांनी शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांच्या आत राजस्थान, गिरनार आणि चार धामची यात्रा पूर्ण केली. तसेच, त्यांनी कारने प्रवास करून आपली नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली. इतर प्रवाशांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी दुसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करण्याचे ठरविले. २ नोव्हेंबर २०१९ ला त्या पुण्याहून निघाल्या आणि ५ नोव्हेंबर २०१९ ला नर्मदा परिक्रमा करण्यास सुरुवात केली. त्या दररोज सकाळी लवकर उठून चालण्यास सुरुवात करायच्या आणि संध्याकाळ होईपर्यंत जवळपास १५ ते ३० किमी अंतर पार पाडायच्या. त्यानी आपली संपूर्ण नर्मदा परिक्रमा १९ मे २०२० पर्यंत पूर्ण केली.

नवीन तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेच्या पद्धतीमध्ये प्रगती झाल्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कमी वेळ राहावे लागते; तसेच कमी वेळेमध्ये सांध्यांची चांगली हालचाल करता येते. ज्यांना असे वाटते, की शस्त्रक्रियेनंतर आपले आयुष्य संपले, त्यांच्यासाठी सुलभा कुलकर्णी प्रेरणा आहेत.

- डॉ. नीरज आडकर

loading image