नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यात ६३१ नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Corona-patient
Corona-patientSakal media
Summary

पुणे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) नवीन वर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) ६३१ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील ३९९ जण आहेत. याउलट दिवसात ३१५ जण कोरोनोमुक्त (Coronafree) झाले आहेत. अन्य दोन जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. दिवसातील मृत्यूमध्ये शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ३९९ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८४, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश आहे.

Corona-patient
पुणे : पतसंस्थांच्या ठेवींसाठी विमा योजना राबविणार

जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १२७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ११०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७, नगरपालिका हद्दीतील १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने शनिवारी (ता.१) तीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ३ हजार २७४ झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ६१२ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित २ हजार ६६२ जण हे गृह विलगीकरणात आहेत.

पुण्यात दोन हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण

जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. सद्यःस्थितीत शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला आहे. शहरात सध्या २ हजार ७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३०६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ७६४ जण गृह विलगीकरणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com