
पुणे : पानशेत धरण फुटीस उद्या (ता. १२) ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत १०३ पूरग्रस्त सोसायट्यांपैकी केवळ १२ सोसायट्यांना मालकीहक्काने भूखंड करून मिळाले आहेत. दरम्यान, पूरग्रस्त सोसायट्यांना जमीन मालकी (भूखंड) हक्काने करून घेण्यासाठी राज्य शासनाने दिलेली तीन वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. ही मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी पानशेत पूरग्रस्त गृहरचना संस्थांच्या विकास महामंडळाने राज्य शासनाकडे केली आहे.