उंचखडक येथे नवरात्रीनिमित्त हरिनाम सप्ताह

उंचखडक येथे नवरात्रीनिमित्त हरिनाम सप्ताह
Published on: 

आळेफाटा, ता. ५ : राजुरी (ता. जुन्नर) येथील उंचखडक येथे श्री भैरवनाथ देवस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त ६४ वा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्‍वरी पारायण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. ११) पासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानने केले आहे.
सप्ताहात पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्‍वरी पारायण, नेमाचे भजन आणि हरिपाठ होईल. दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत दीपा शिंदे (मुंबई), श्रावण महाराज साळुंखे (कर्नाटक), साध्वी वैष्णवी दीदी (पुणे), अनिता सुद्रिक (आळंदी), द्वाराचार्य रामकृष्ण लहवितकर (नाशिक), भागवताचार्य समाधान शर्मा (बीड), पोपट पाटील (कासारखेडा), योगीराज गोसावी (पैठण), अक्षय भोसले (सातारा) व दयानंद कोरेगावकर (कोपरगाव) यांची कीर्तने होतील.
शुक्रवारी (ता. १६) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तर रविवारी (ता. १८) दिंडी सोहळा होईल. कीर्तनास उपस्थित भाविकांमधून लकी ड्रॉद्वारे दररोज एका पुरुष व महिलेला ज्ञानेश्‍वरी ग्रंथ, पोशाख व पैठणी दिली जाणार आहे. तसेच दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय हाडवळे, उपाध्यक्ष भाऊ कणसे, सचिव सयाजी हाडवळे, खजिनदार बी. टी. डुंबरे व संचालक मंडळाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com