
पुणे : कचऱ्यातील चिंध्या, लेदर, गाद्यांवर प्रक्रिया करण्यासाठी रामटेकडी येथे ७५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. पंधरा वर्ष मुदतीसाठी ठेकेदार नियुक्त करणे आणि त्यासाठी ६६ कोटी ८ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च करण्यास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, आजची स्थायीची बैठक ही तहकूब सभा होती, त्यात नवीन विषय मंजूर करणे शक्य नव्हते. त्यामुळे कालची सभा तहबूक झाल्यानंत हा प्रस्ताव स्थायी समितीला दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या अतिघाईबाबत संशय उपस्थित केला जात आहे.