नद्यांतून काढला ७ टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे. निमित्त होते ते मुठाई महोत्सवाचे.  ‘जीवित नदी’तर्फे २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव झाला. 

पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे. निमित्त होते ते मुठाई महोत्सवाचे.  ‘जीवित नदी’तर्फे २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव झाला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

नदी या विषयावर काम करणाऱ्या शहरातील इतर संस्था आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रामुख्याने मुळा, मुठा, राम नदीसह इंद्रायणी, पवना या नद्यांतील आणि नदी घाटाशेजारी असलेला कचरा, जलपर्णी काढण्यात आली. 

कवडीपाट परिसरातील ६ टन ५७६ किलो कचरा ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’ ने काढला. एवढा कचरा काढूनही नदीतील कचरा काढण्याचे काम सुरूच आहे, असे ग्रुपचे समन्वयक पुनीत शर्मा यांनी सांगितले. तसेच, मुळा, मुठा, राम नदीतून २४०० किलो काचेच्या बॉटल्स्‌, १६०० किलो संमिश्र कचरा, ८०० किलो प्लास्टिकचा कचरा बाहेर काढला गेला. पवना आणि इंद्रायणी नदीतून प्रत्येकी तीन ट्रक जलपर्णी काढण्यात आली. या महोत्सवादरम्यान राजाराम पूल आणि औंध येथील राजीव गांधी पुलावर हातात ‘नदी वाचवा’चे बोर्ड घेऊन ‘जीवित नदी’च्या कार्यकर्त्यांनी तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांशी नदी सुधारणा व स्वच्छता यावर संवाद साधला. तसेच, शाळकरी मुलांना ‘स्टोरी टेलिंग’द्वारे जलपर्णी आणि नदीचे आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींना आपण कसे थांबवू शकतो, याची माहिती दिली.

राम नदीसाठी वसुंधरा स्वच्छता अभियान, इंद्रायणीसाठी अविरत श्रमदान, पवनासाठी रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी या संस्थांनी काम केले. २८ नोव्हेंबरला ‘भारतीय नदी दिवस’ साजरा करीत महोत्सवाची सांगता झाली. 

बहुतेक लोकांना नदीविषयी माहितीच नाही. आपल्याला रोजच्या वापराचे पाणी कोठून येते, वापरलेले पाणी कोठे जाते, याची प्राथमिक माहितीही बहुतेक लोकांना नसते. त्यामुळे नदी स्वच्छ करतानाच लोकांमध्ये नदीविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. 
- शैलजा देशपांडे, संस्थापक - संचालक, जीवित नदी 

Web Title: 7 tons of garbage removed from the rivers