Pune News: शर्यत सुरू असताना अचानक उधळले बैल; बैलगाड्याची धडक लागल्याने वृद्धाचा मृत्यू

Pune News: पुण्याच्या भोरमध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
Pune News
Pune NewsEsakal

पुण्याच्या भोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोरमध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विष्णू गेनबा भोमे (वय ७०) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. भोमे हे शिंद गावातील रहिवासी होते. बैलाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्याच्या भोरमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान, शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला बैलगाडा धडकल्यानं जखमी झाला होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. बैलगाड्याची धडक बसल्याने भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती, त्यांनतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

Pune News
Nashik Lok Sabha Constituency: नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांची माघार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मानले आभार

रामनवमी आणि जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भोरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भोमे भोर येथे आले होते. भोमे यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड होती. एकेकाळी त्यांच्याकडे शर्यतीचा बैल होता. दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू असताना अचानक बैल उधळून भोमे यांच्या दिशेने आला. त्यांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये भोमे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune News
Loksabha Election: भुजबळांनी माघार घेतल्याने महायुतीचा तिढा सुटला? शेवटची यादी जाहीर होण्याची शक्यता

धडक बसल्यानंतर भोमे यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला होता. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी भोमे यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असताना भोमे यांच मृत्यू झाला आहे.

Pune News
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीत जातो असं फडणवीस म्हणाले होते; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com