

धरणग्रस्तांना अतिक्रमणाच्या नोटिसा; ७३२ कुटुंबांचा जलसमाधीचा इशारा
२८ वर्षांपासून पर्यायी जमीन नाही; गाळपेरा जमिनीही हिरावून घेण्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
आवाटी, ता. ७ : सीना-कोळेगाव धरणासाठी जमिनी देऊन २८ वर्षे उलटूनही पर्यायी जमीन मिळालेली नाही. त्याच संपादित जमिनीवर गाळपेरा करून उदरनिर्वाह करणाऱ्या धरणग्रस्तांना आता जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा तत्काळ रद्द न केल्यास ७३२ कुटुंबांसह जलसमाधी घेण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील आवाटी, निमगाव हवेली, कोळगाव, हिवरे, मिरगव्हाण अन् भालेवाडी या सहा गावांतील ७३२ शेतकरी कुटुंबांच्या हजारो एकर जमिनी सीना-कोळेगाव प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या. ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ हा शासनाचा नियम असतानाही २८ वर्षांपासून पर्यायी जमीन मिळालेली नाही, असा धरणग्रस्तांचा दावा आहे.
उदरनिर्वाहासाठी धरणग्रस्त त्याच संपादित जमिनीवर गाळपेरा करीत असून, लाखो रुपये खर्च करून या जमिनी वहिवाटीस आणल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता याच जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगून उपसा सिंचन विभाग क्रमांक १, परांडा यांनी जा. क्र. उसिउवि/ताशा/१६३/२०२६, १२ ऑगस्ट २०२६ अन्वये अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
कोट PDE26B05438
- आमचा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. न्याय मिळाला नाही तर ७३२ कुटुंबे जलसमाधी घेऊन जीवन संपवतील, याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.
- सतीश नीळ पाटील, संघटक, सीना-कोळेगाव धरणग्रस्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.