Dr. Suraj Ingole
sakal
लोणी काळभोर - वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञांनी ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) या अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे ७५ वर्षीय रुग्णाला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि वैद्यकीय पथकाशी संवादही साधत होता.