Diwali Faral : पुणे शहर पोस्ट ऑफिस मधून ७५०० किलो फराळ परदेशात

महिनाभरात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह तर देशात पोस्टाच्या माध्यमातून पोहोचला फराळ.
Post office
Post officesakal

वेल्हे, (पुणे) - पुणे पोस्ट विभागाने दिवाळी निमित्त, परदेशात असलेल्या आपल्या प्रियजनांना फराळ पाठवता यावे यासाठी " दिवाळी फराळ परदेशात" हा उपक्रम २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबवला होता. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद पुणे शहरातील नागरिकांकडून मिळाला.

पुणे शहरातील पोस्ट ऑफिसेस मधून जवळ जवळ ७५०० किलो फराळचे पार्सल महिनाभरात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान,सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच इतर देशात पाठवण्यात आले. या निमित्ताने पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा पुण्यातील पर्वती पोस्ट कार्यालयात बुधवार(ता.२९) रोजी पार पडला असल्याची माहिती पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली.

यावेळी पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी सर्व गुणवंत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भविष्यात अशीच जनतेची सेवा करायचे आवाहन केले. पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा प्रचार प्रसार अजूनही पाहिजे. त्या प्रमाणात झालेला नाही, तो वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचे दर बाकीच्या कुरिअर च्या तुलनेत स्वस्त आहेत.

त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पोस्टमन डाक पोस्ट विभागाचा कणा आहे व यामध्ये पोस्टमन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तसेच जनतेपर्यंत ही माहिती पोहूचु शकतात असेही सांगितले.

पुणे क्षेत्राच्या डाक संचालिका सिमरन कौर म्हणाल्या की, येणाऱ्या भविष्यकाळात डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार e commerce क्षेत्रामुळे होणार आहे. त्यामधे पोस्ट ऑफिसेसची महत्वपूर्ण भूमिका असली पाहिजे. कारण पोस्ट ऑफिस चे सर्वात मोठे नेटवर्क आहे व देशातल्या काना कोपऱ्यात पोस्ट ऑफिस मधून पार्सल बुकिंग तसेच डिलिव्हरी होऊ शकतात.

या सोहळ्याला पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, डाक संचालिका सिमरन कौर, आर.पी.गुप्ता, पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. अभिजित इचके, पुणे शहर पश्चिम विभागाच्या अधीक्षक श्रीमती रिपन दुल्लेत, पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे व पोस्टाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उप प्रबंधक नागेश डुकरे यांनी केले तर व आभार प्रदर्शन शरद वांगकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com