esakal | ज्वारी, डाळींच्या दरात मोठी घट; क्विंटलमागे 800-1000 रुपयांची घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वारी, डाळींच्या दरात मोठी घट; क्विंटलमागे 800-1000 रुपयांची घसरण

ज्वारी, डाळींच्या दरात मोठी घट; क्विंटलमागे 800-1000 रुपयांची घसरण

sakal_logo
By
प्रविण डोके

पुणे : बाजारात ज्वारी आणि डाळी मागणी ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे अवकेच्या तुलनेत मागणी अत्यंत कमी असल्याने घाऊक बाजारात ज्वारीचे दर क्विंटलमागे ८००- १००० रुपये आणि तूर डाळ ४००-६०० रूपये, उडीद, मुग डाळ ५००-८०० रूपये, वाटाणा ५००- ८०० रुपयांनी उतरले आहेत.

येत्या काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहिल्यास हा भाव आणखी खाली येण्याची शक्यता मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे करोनासंकटात सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. सध्या बाजारात चांगली आणि स्वच्छ ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी जितेंद्र नहार यांनी दिली.

हेही वाचा: लस घेतली तरी नका राहू बेफिकीर

येथून होते आवक -

ज्वारी -

बाजारात जामखेड, नगर, बार्शी, करमाळा, सोलापूर सह राज्यातून साधारणतः दररोज ८० टन तर कर्नाटक येथून २० टन ज्वारीची आवक होते.

डाळी -

महाराष्ट्रातून विदर्भ, मराठवाड्यातून तसेच परराज्यातील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान येथून डाळींची दररोज साधारणतः १०० टन आवक होते. तसेच वाटाणा हा कॅनडा, अर्जेंटिना येथून आयात केला जातो.

हेही वाचा: दिसेल त्या वाहनावर कोयते मारून माजवली दहशत

''मागील काही काळात लॉकडाऊनमुळे आवक नव्हती. परंतु सध्या बाजार व्यवस्थित सुरू झाल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच ज्वारीचा खप एकदम कमी झाला आहे. अवकेच्या तुलनेत मागणी अत्यंत कमी असल्याने ज्वारीचे भाव कमी झाले आहे. यापुढेही दर वाढण्याची शक्यता नाही.''

- जितेंद्र नहार, धान्य व्यापारी, मार्केट यार्ड

  • डाळींच्या आयातीला परवानगी

  • सध्या आयात मोठ्या प्रमाणावर सुरू

  • केंद्र सरकारने स्टॉकवर बंधने आणली

  • बाजारात माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

  • बाजारात ग्राहक ४० - ५० टक्क्यांनी घटले

  • मालाला उठाव नाही

दोन महिन्यांतील भाव क्विंटलमध्ये

धान्य प्रकार - जून २०२१ --- जुलै २०२१

- ज्वारी गावरान १ नं - ४५०० - ५२०० -- ३६००- ४२००

- ज्वारी धुरी (कर्नाटक) - २४००-२६५० -- २१००-२३५०

- ज्वारी गावरान १ नं - ३२०० - ३६०० -- २४०० - २७००

- मुगडाळ - ९२०० - ९९०० -- ८४०० - ९१००

- उडीद डाळ - ८८०० - १०४०० -- ८२०० -९६००

- तुर डाळ - ९१०० - ९९५० -- ८६०० - ९६००

- सफेद वाटाणा - ७८०० - ८५०० -- ६५०० - ७५००

- हिरवा वाटाणा - ११९०० - १४५०० -- ११३०० - १३५००

loading image