पुण्यात कोरोनाचा कहर; बुधवारी ८ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient
पुण्यात कोरोनाचा कहर; बुधवारी ८ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण

पुण्यात कोरोनाचा कहर; बुधवारी ८ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण

पुणे - शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढताना दिसत असली तरी, घरच्या घरीच कोरोनामुक्त (Coronafree) होणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने खूप मोठे आहे. शहरात उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अगदी नगण्य असल्याचे दिसून आले आहे. सध्या शहरातील २१ हजार ४८४ सक्रिय रुग्णांपैकी केवळ १ हजार १९ जण रुग्णालयांत दाखल आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शहरातील एकूण सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात फक्त पावणे पाच टक्के (४.७४ टक्के) इतके आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना रुग्ण आकडेवारीच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहराप्रमाणे जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. जिल्ह्यातील एकूण ३६ हजार २४९ सक्रिय कोरोना रुग्णांपैकी केवळ १ हजार ७५२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करावे लागले आहे. रुग्णालयांत दाखल होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, कोरोना लसीकरणाचा डोस न घेतलेले आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

हेही वाचा: खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी (ता. १२) दिवसभरात ८ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ८५७ रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ११, नगरपालिका हद्दीत २५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १५६ रुग्ण सापडले आहेत.

याउलट दिवसात ३ हजार १० जण कोरोनामुक्त झाले असून, अन्य तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ८०५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ५९१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४२२, नगरपालिका हद्दीतील ११८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७४ जणांचा समावेश आहे. बुधवारी जिल्ह्यात ३८ हजार ३६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

क्षेत्रनिहाय कोरोना रुग्ण स्थिती

क्षेत्र रुग्णालयात दाखल गृहविलगीकरणातील रुग्ण एकूण रुग्ण

पुणे, १०१९, २१ हजार ४८४, २२ हजार ५०३

पिंपरी चिंचवड, ४५४, ९ हजार ३२, ९ हजार ४८६

जिल्हा परिषद, ११९, ४ हजार १९५, ४ हजार ३१४

नगरपालिका क्षेत्र, ८७, ८९९, ९८६

कॅंटोन्मेंट बोर्ड, ७३, ६३९, ७१२

एकूण, १ हजार ७५२, ३६ हजार २४९, ३८ हजार १.

Web Title: 8342 New Corona Patients Found In Pune District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecorona patients
go to top