
पुणे : सध्या तरुणांमध्ये जीवनशैली व आजारांविषयी जनजागृतीबरोबरच आरोग्यासंबंधी ऑनलाइन माहिती शोधण्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांविषयी डिजिटल माध्यमातून माहिती शोधणाऱ्या नागरिकांची संख्या २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशभरात तब्बल ८४ टक्के इतकी वाढली आहे. त्यावरून तरुण पिढी जीवनशैली व आजारांबाबत अधिक सजग झाल्याचे दिसते.