esakal | Coronavirus : पुणे विभागातही रुग्णांच्या संख्येत वाढ; सध्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : पुणे विभागातही रुग्णांच्या संख्येत वाढ; सध्या...

- पुणे विभागात 85 रुग्ण पॉजिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Coronavirus : पुणे विभागातही रुग्णांच्या संख्येत वाढ; सध्या...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे विभागात कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्या 2 एप्रिल सायंकाळअखेर 85 झाली असून, पुणे महापालिका 41, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 1899 होते. त्यापैकी 1669 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून, 176चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1544 नमुने निगेटीव्ह आहेत व 85 नमुने पॉझिटीव्ह आहेत.आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. 

विभागामधील 7746 प्रवाशांपैकी 4591 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून, 3155 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, म्हणजेच 3155 व्यक्तींचा होम क्वारंटाइंन पूर्ण झालेला असून, 4591 व्यक्ती अजूनही क्वारंटाइन आहेत. आजपर्यंत 14,99,431 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 70,32,601 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

loading image
go to top