...तर हे झाले असते महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी सुद्धा

...तर हे झाले असते महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी सुद्धा

निमगाव केतकी (पुणे) : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथे पीरसाहेब यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती आखाड्यात यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी हर्षवर्धन सदगीरचा सत्कार झाला. सत्कारास प्रमुख पाहुणे म्हणून गावातीलच एकेकाळचे कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत असलेले 85 वर्षांचे अण्णा शिंदे आखाड्यात आले. दोघे शेजारी उभे राहताच आखाड्यात चर्चा रंगली ती अण्णांच्या त्या काळातील थिएटरवर गाजलेल्या कुस्त्यांची. प्रचंड क्षमता असतानाही केवळ स्पर्धेत न उतरल्याने हा मल्ल या बहुमानापासून वंचित राहिल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

1970 दशकाच्या आसपास थिएटरवरील कुस्तीला मोठी क्रेज होती. या काळात महाराष्ट्र केसरी किताबाचा बहुमान मिळविण्याची क्षमता असतानाही केवळ या स्पर्धेत न उतरल्याने काही नामांकित मल्ल या पदापासून वंचित राहिले. यातील अण्णा शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. शिंदे यांची त्या काळची परिस्थिती बेताची होती. पण खेळी भारी असल्याने पुण्यातील शिवरामदादा तालमीतील त्यांचा खुराकाचा सर्व खर्च होनराव अप्पा करत होते. 1555 ते 1972 या काळात त्याची कुस्ती क्षेत्रात मोठी हवा होती. स्पर्धेतील कुस्तीपेक्षा थिएटरच्या कुस्तीला व गाव आखाड्यातील कुस्तीला मोठी क्रेज होती.

अण्णांच्या पुण्यात त्या वेळी थिएटरला तिकिटावर आठ मोठ्या कुस्त्या झाल्या. सर्व कुस्त्या खूप गाजल्या होत्या. लग्नानंतर त्यांनी कुस्ती सोडली होती. पण एक अपत्य झाल्यानंतर त्यांची 1772 मध्ये तुकाराम शिंदे या मोठ्या मल्लाबरोबर कुस्ती ठरली. चार महिने सराव केल्यानंतर डेक्कन जिमखान्यात त्यांची तुकाराम शिंदे बरोबर दीड तास झालेली कुस्तीची आजही अनेक जण आठवण काढतात. पिंजऱ्यात व पोलिस संरक्षणात झालेल्या या कुस्तीची तिकिटे ब्लेकने विकली गेली होती. त्यावेळी त्यांची देहू, कोंढवा या भागात बारा बैल जोडून मिरवणूक काढली होती.


अण्णांची शरीरयष्टी आखीवरेखीव होती. त्यांनी जमिनीला पाठ टेकू दिली नाही. सर्व गाजलेल्या कुस्त्या आपण पाहिल्या आहेत. स्पर्धेकडे लक्ष दिले नाही. ते जर स्पर्धेत उतरले असते तर सलग दोन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाले असते. गावाला व तालुक्‍याला कायम हा बहुमान राहिला असता.''
- अर्जुन म्हेत्रे, (वय 75), ग्रामस्थ, वरकुटे खुर्द

त्या काळी अण्णांचा कुस्तीक्षेत्रात मोठा दबदबा होता. त्यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर ते महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी सुद्धा झाले असते. एवढी त्यांची क्षमता होती.
- तानाजी सोरटे, पहिलवान अण्णा शिंदे यांचे चाहते

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com