Katraj Fire Brigade : कात्रज अग्निशामक दलाची भरीव कामगिरी ; पाच वर्षात ८६१ आगीच्या आणि १०९ अपघातांच्या घटनांचा सामना

कात्रजमधील अग्निशामक दलाच्या केंद्राने भरीव कामगिरी केली आहे. कात्रज, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रजघाट, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव, कोळेवाडी, जांभुळवाडी, धनकवडी आदी भागातील जवळपास ८६१ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी यश मिळविले.
Katraj Fire Brigade
Katraj Fire Brigadesakal

कात्रज : कात्रजमधील अग्निशामक दलाच्या केंद्राने भरीव कामगिरी केली आहे. कात्रज, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रजघाट, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव, कोळेवाडी, जांभुळवाडी, धनकवडी आदी भागातील जवळपास ८६१ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी यश मिळविले. तसेच, अपघात, बचावकार्य, झाडपडी, अॅनिमल रेस्क्यूसारख्या घटनांचाही सामनाही दलाने केला आहे. मागील २२ वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासून अग्निशामक दलाचे काम सुरळित चालू आहे.

५ वर्षात कात्रज घाट, कात्रज तलाव, जांभुळवाडी तलाव, जांभुळवाडी दरीपुल भागात सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या घटनांतील बचावकार्य असो की, मध्यरात्रीच्या वेळी परिसरातील कोणत्याही आगीच्या घटनांवर नियंत्रयण मिळविण्यांसारख्या घटनांमध्ये कात्रज आग्निशामक दलाने तीन शिफ्टमध्ये काम करत मोलाची कामगिरी बजावली आहे.

कात्रज घाटातील तलावातील मृतदेह शोधणे, साप पकडणे, अडकलेल्या मांजरी, प्राणी, पक्षांची सुटका करणे अशी कामेही आम्ही करत असल्याचे दलाचे कर्मचारी वसंत भिलारे आणि सचिन शिंदे यांनी सांगितले. तसेच, वेळ पडली तर पुतळे धुणे, चिखलाने माखलेले रस्ते साफ करणे अशी कामेही करावी लागत असल्याचे तेजस मांडवकर आणि संदीप घडशी यांनी सांगितले. जांभुळवाडी दरीपुल, कात्रज घाट हा जंगलाचा भाग असल्याने वणव्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात.

उपनगर आणि गावठाण भाग असल्याने काही ठिकाणी घरांची दाटीवाटी आहे. अशा ठिकाणी पाण्याचा बंब घेऊ जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रत्येक रहिवाशी सोसायट्यांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यांसाठी एक यंत्रणा असते. मात्र, ती एकदा बसविल्यावर चालू आहे की नाही, याकडे सभासदांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे ऐनवेळी दुर्घटना घडल्यास ती यंत्रणा कामाला येत नाही. त्यामुळे सोसायट्यांनी त्या यंत्रणांची सातत्याने देखभाल दुरुस्ती करायला हवी, अशा सूचना सातत्याने आग्निशामक दलाकडून देण्यात येतात

Katraj Fire Brigade
Loksabha Election 2024 : भाजपला खात्री, तर कॉँग्रेसला बदलाची आशा ; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख नेत्यांच्या होणार सभा

आग लागल्यावर काही प्राथमिक गोष्टी करणे गरजेचे असते, त्या नागरिकांनी करणे आवश्यक आहे. यामध्ये अनेकजण आग सुरक्षा नियमांचे उल्लंघन करतात. नियमांचे उल्लंघन केल्यानेच आगीच्या मोठ्या प्रमाणात घटना होतात. गॅसच्या बाबतीत नागरिकांकडून अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सोसायट्यांनीही सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. - प्रदीप खेडेकर, केंद्रप्रमुख, कात्रज अग्निशामक केंद्र.

५ वर्षातील कार्य

वर्ष-आगीच्या घटना-अपघात आणि बचावकार्य-झाडपडी-अॅनिमल रेस्क्यू-बुडीत वर्दी-गॅस लिकेज

  • २०१९-२०१-४९-८७-४१-१२-११

  • २०२०-१६३-१२-११७-४७-५-२१

  • २०२१-१७०-२४-६०-७०-३-८

  • २०२२-१७३-१२-५३-४४-७-७

  • २०२३-१५४-१२-५७-८९-१-८

  • एकूण-८६१-१०९-३७४-२९१-२८

अशी आहे यंत्रणा

  • - एकूण गाड्या २- एक मोठे फायर इंजिन, १ छोटे फायर इंजिन

  • - एकूण कर्मचारी २२ ः १ केंद्रप्रुमख, ३ चालक, १८ फायरमन

  • - ७० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी

सद्यस्थिती काय?

  • - एका शिफ्टमध्ये एका गाडीवर ३ कर्मचारी

  • - गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्याची गरज

  • - एका वेळी एकाच गाडीचा वापर

  • - रस्त्याच्या कामामुळे लँडलाईन फोन बंद

  • - कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर काम सुरु

आग्निशामक केंद्राचा संपर्क क्रमांक ०२०-२४३६८८८७

किंवा १०१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com