सुरक्षारक्षकाच्या मुलीने गाठले 88.46 टक्‍क्‍यांचे ध्येय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - दहा बाय दहाच्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या...अन्‌ लिहिता वाचता न येणाऱ्या निंबाळकर कुटुंबामध्ये बारावीपर्यंत पोचलेली अश्‍विनी ही पहिलीच मुलगी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अश्‍विनीने बारावीच्या परीक्षेत (वाणिज्य शाखा) 88.46 टक्के गुण मिळवले. आजपर्यंत शिक्षणापासून वंचित असलेल्या कुटुंबातील अश्‍विनीने ज्ञानाच्या बळावर यशाला गवसणी घातली आहे. 

""अभ्यास करायचा आहे, म्हणून हेच हवे, तेच हवे, असे काही नसते. अभ्यास करायचा ठरविले की मग तो कोठेही आणि कसाही करता येतो. फक्त अभ्यास करण्याची जिद्द मनात असावी लागते. ध्येय गाठण्याचा मार्ग आपोआप मिळत जातो,'' असे आपल्या यशाचे गमक अश्‍विनी हिने उघड केले. अश्‍विनी सरस्वती मंदिर संस्थेच्या श्रीमती सुशीला बहुधनी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वाणिज्य शाखेतच पुढील शिक्षण घ्यायचे तिने ठरविले आहे. 

धायरीतील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या निंबाळकर कुटुंबामध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेणारी अश्‍विनी ही पहिलीच मुलगी. मूळचे कर्नाटकातील असणारे निंबाळकर कुटुंब दहा-बारा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आले. गणेशनगरमधील एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून रमेश निंबाळकर यांना काम मिळाले आणि त्याच इमारतीच्या तळमजल्यात पत्र्याच्या दहा बाय दहाच्या खोलीत त्यांनी रेणुका यांच्यासोबत संसार थाटला. निंबाळकर यांना चार मुली आहेत. चारही जणींना शिकून मोठे करण्याचे स्वप्न रमेश यांनी उराशी बाळगले आहे. त्यातील ज्येष्ठ कन्या अश्‍विनी आहे. 

Web Title: 88.46 percent goal achieved by security guard daughter