बारामतीत कोरोनाचे थैमान; एकाच दिवसात तब्बल...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

शहरात आज कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बारामती : शहरात आज कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज एकाच दिवशी कोरोनाचे नऊ रुग्ण सापडल्याने आता बारामतीकरांचेही धाबे दणाणले आहे. वसंतनगर मधील परिचारिकेच्या संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान बारामती शहरातील गुनवडी चौकातील शाहू कॉम्प्लेक्समधील एक दुकानदार, रुई येथील एक ग्रामस्थ तसेच श्रीरामनगरमधील एक नागरिक आणि जेबीएस टाऊनशीपमधील एक असे एकूण नऊ जण कोरोनाबाधित असल्याचे आज निष्पन्न झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागल्याने आता चिंतेची स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. कालपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 40 वर पोहोचली होती आज हीच संख्या आता 49 पर्यंत जाऊन पोहोचली. या पैकी चार जणांचा मृत्यू झाला असून 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिक बिनधास्तपणे शहरात विनामास्क फिरताना दिसत होते, सोशल डिस्टन्सिंगसह इतरही निर्बंध फारसे कोणी पाळत नसल्याचेच चित्र होते. आता आज एकाच दिवशी नऊ रुग्ण सापडल्याने बारामतीचे प्रशासन व उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती कोरोनामुक्त झाली आहे, असे वाटत असतानाच ज्यांना कोरोना होतो आहे त्यांच्या संपर्कातील लोकही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत आहे. काही जणांना मुंबईच्या प्रवासाचा इतिहास आहे, त्यामुळेही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. 

(Edited By : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 New Corona Infected patients were found in Baramati