Vikas Jadhav : १३ राज्य, ९००० किमी सायकल प्रवास, केवळ ६३ दिवसात

वाघोलीतील विकास जाधव या तरुणाची सायकलवारी.
Vikas Jadhav
Vikas Jadhavsakal
Updated on

वाघोली - १३ राज्य, ९००० किमी सायकल प्रवास. केवळ ६३ दिवसात. तो ही एकट्याचा. नऊ ज्योतिर्लिंगचे दर्शन त्याने घेतले. विकास शंकर जाधव असे या वाघोलीतील सायकल वेड्या अवलियाचे नाव.

२६ जानेवारी २०२५ रोजी विकास याने शिवनेरी किल्यावर जाऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन सायकल प्रवास सुरू केला. सर्वात प्रथम भीमाशंकर येथील मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर नाशिक येथील त्र्बकेश्वर व नंतर अन्य ज्योतिर्लिंगचा प्रवास विकासाचा सुरू झाला.

दररोज १५० ते १८० किलोमीटर प्रवास तो दररोज करायचा. सोबत राहण्यासाठी टेन्ट व इतर साहित्य होते. पेट्रोल पंप अथवा मंदिरात टेन्ट लावून विकास मुक्काम करायचा. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत. कधी कधी रात्री आठ वाजेपर्यंत त्याचा प्रवास सुरू असायचा.

संभाजीनगर येथील घृश्नेश्वर, ओंकारेश्वर, महाकालेश्वर, काशी विश्वनाथ बाबा बैद्यनाथ, श्रीशैलम मलिक्काअर्जुन, रामेश्वरम असे त्याने दर्शन घेतले. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, उडिसा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा अशा १३ राज्यात त्याने प्रवास केला. २९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता तो वाघोलीत परतला.

या प्रवासासाठी त्याला केवळ ३० हजार रुपये खर्च आला. अनेक राज्यात अनेक ठिकाणी त्याला घरी नेवून नागरिकांनी जेवू घालून पाहुणचार केला. यापूर्वी त्याने राम मंदिर उद्घघाटनावेळी अयोध्यावरी तसेच नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तिपीठचे दर्शन सायकल वारी करून घेतले आहे.

विकास हा दररोज ३० ते ४० किमी सायकल चालवून सराव करतो. तो कॅब चालक असून अविवाहित आहे. वाघोलीत परतल्यानंतर अनेकांनी त्याचे स्वागत करून अभिनंदन केले.

राम मंदिर उद्घघाटन कार्यक्रमाला हजेरी लावायची असा निश्चय केला. सायकल वारी करून तेथे जायचे असे मनोमनी ठरवले. सराव केला. नियोजन केले अन् अयोध्या वारी यशस्वी झाली. जणू श्रीराम दर्शनाने एक ऊर्जा अन् प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर अजून एक सायकल वारी केली. मनोधैर्य वाढल्याने ही ९००० किमी ची सायकल वारी यशस्वी झाली. भविष्यात खूप ठिकाणे सायकल वर गाठायचे आहेत.

- विकास जाधव, सायकलस्वार, वाघोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Hidden Waterfalls Near Pune And Mumbai
Solapur city police
Gadchiroli
Wari Festival Update: Authorities Propose Exemption to Continue Ashadhi Wari Arrangements Smoothly
Marathi News Esakal
www.esakal.com