esakal | अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असला, तरी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध पाळल्यामुळे व कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळाल्यामुळे पुरंदर तालुक्यात बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत असून, कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. 

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

sakal_logo
By
श्रद्धा जोशी

गुळुंचे (पुणे) : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असला, तरी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध पाळल्यामुळे व कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळाल्यामुळे पुरंदर तालुक्यात बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत असून, कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुरंदर तालुक्यातील नीरा येथील प्रभाग क्रमांक दोनमधील ९५ वर्षीय आजींनी कोरोनावर मात केली असून, त्या घरी आल्या असता ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामस्थ यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या आजींचा २८ जुलै रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या घरातील इतर २ जणांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालू होते. उपचारांती ६ ऑगस्ट रोजी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. पुणे येथे पाच दिवस ते  होम क्वारंटाइन राहून आज नीरेतील निवासस्थानी आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, दीपक काकडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी घाटगे,  माजी सरपंच राजेश काकडे, नाना जोशी, चंद्रकांत धायगुडे, बाळासाहेब भोसले, हरिभाऊ जेधे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, बापू भंडलकर, शिवाजी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.      

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
              
नीरा येथील प्रभाग क्रमांक २, ५ व ३ मधील एकूण १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.  त्यापैकी आजअखेर प्रभाग ५ मधील महिला आधीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी ऍडमिट झाली होती. ती मृत पावली. त्यानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर, १३ जण बरे होऊन घरी परतले. पिंपरे खुर्द येथील २ व नीरेतील १, असे ३ रुग्ण अद्याप जेजुरी, सासवड व पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

loading image