पुण्यातील 'या' रुग्णालयात कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 99.3 टक्के

हरीश शर्मा  
Thursday, 6 August 2020

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 99.3%        

खडकी बाजार : भारत देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार ही केले जात आहेत. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक 99.3% एवढे आहेत. रुग्णालयातील डॉक्टर व संपूर्ण कर्मचारी वर्ग अतिशय आपुलकीने रुग्णांबरोबर उपचारादरम्यान वागणूक देत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खडकीतील डॉ. आंबेडकर रुग्णालया हे कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे चालविले जाते. कोरोना बाधित रुगणांसाठी येथे स्वतंत्र विभाग बनवण्यात आला असून, आतापर्यंत येथे 543 रुग्णांनी उपचार घेतले असून त्यापैकी 376 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आता सद्यःस्थितीमध्ये रुग्णालयात 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती देताना बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह म्हणाले "आम्ही खडकीकरांसाठी पुरेपूर काळजी घेत आहोत. आरोग्य,स्वच्छता, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. खडकी परिसरात कोरोनाचा अधिक शिरकाव होऊ नये यासाठी खडकी बाजार सुरू करण्याबाबतही महत्वपूर्ण निर्णय घेऊंन आम्ही आठवड्यातून 4 दिवस  बाजार उघडण्याचे आदेश दिले असून 3 दिवस बाजार बंद ठेवले आहे. हे जर बाजार 4 दिवस खुला असेल तर बंद असलेल्या 3 दिवसात जर कोणाला कोरोना ताप अथवा शंका वाटल्यास ते 3 दिवस विश्रांती घेऊ शकतात आणि बरे होतील व 3 दिवस बोर्डाच्या आरोग्य विभागाला व्यवस्थित स्वच्छता करता येईल. तसेच रुग्णालयात स्वॅब घेताना रुग्णाला खुर्चीवर बसवून डॉक्टर स्वॅब घेतात. यापुढे स्वॅब देणारा उभे राहूनच स्वॅब देऊ शकेल अशी व्यवस्था लवकरच करण्यात येईल. कारण एकच खुर्चीवर सर्व रुग्ण बसून स्वॅब देतात त्यामुळे बाधा पोहोचण्याची जास्त शक्यता असते. याबरोबरच बोर्ड पूर्णपणे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 99.3% cure rate of Kovid patients in Khadki Cantonment Board Hospital