IPS Bhagyashree Navatakke
IPS Bhagyashree Navatakke sakal

BHR Scam: पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण चिघळले, भाजप नेत्यानंतर महिला आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Latest Jalgaon News: गृह विभागाच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Published on

Latest Pune News : आर्थिक गैरव्यवहार करत ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांवर दाखल असलेल्या प्रकरणात आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीएचआर पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी २०२१ साली गुन्हा दाखल होता. त्यावेळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त नवटक्के कार्यरत होत्या. नवटक्के यांची या प्रकरणात काय भूमिका आहे. त्यांच्यावर कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेले नाही.

 IPS Bhagyashree Navatakke
Nagpur Crime : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड; ५९ सिलिंडर आणि गॅस रिफिलिंग मशीनसह इतर साहित्य जप्त

या प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या पतपेढीविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बीएचआरसी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.

 IPS Bhagyashree Navatakke
Mumbai Crime News: घरातील कामं करत नाही म्हणून चिमुकल्याच्या गुप्तांगावर चटके; सावत्र आईचा घृणास्पद प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com