esakal | श्री साई एज्युकेशन ट्रस्टचा विधायक उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

श्री साई एज्युकेशन ट्रस्टचा विधायक उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : श्री साई एज्युकेशन ( Shree Sai Education) ट्रस्टच्या (Trust) वतीने कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या २३ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी (Education) प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देवून शिक्षणासाठी सहकार्य करण्यात आले.

या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, हभप चंद्रकांतमहाराज वांजळे, प्रा. सागर शेडगे, नानासाहेब मारणे, डॉ. संदीप बुटाला, दिलीप चोरगे, महेश रायरीकर उपस्थित होते. उद्योगपती प्रवीण बडेकर, अनिल घुबे यांचा या मदतीत महत्त्वपूर्ण पुढाकार होता.

महापौर मोहोळ म्हणाले की, कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे व विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले. त्यातच पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीने जो मदतीचा हातभार दिला आहे, तो फार मोलाचा आहे. समाजातील दानशूरांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत अशाप्रकारचे विधायक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

हेही वाचा: 'रामदास तडस' प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?;पाहा व्हिडिओ

हभप वांजळे म्हणाले की, स्वाभिमानाने पुढे येण्यासाठी देवू केलेला साईंचा प्रसाद समजून या मदतीचा उपयोग होईल. विद्यार्थ्यांनी मन खंबीर करून परिस्थितीला सामोरे जा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

कार्यक्रमाचे संयोजन श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी सोपान वांजळे, दत्ता कडू, श्रीकांत, लक्ष्मण वाशिवले, नितीन माझीरे, बाबा वाघ, अनिल करंजावणे, बाप्पू सुतार, बाळासाहेब हरपुडे, विश्वास चौधरी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सागर शेडगे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विजय मराठे यांनी, तर आभार भाऊसाहेब गाजरे यांनी मानले

loading image
go to top