Pune Swargate Accident
esakal
पुणे
Pune Swargate Accident : स्वारगेट जेधे चौकात भरधाव डंपरची धडक; सायकलस्वार ज्येष्ठाचा मृत्यू
Swargate road accident Pune news : स्वारगेट येथील जेधे चौकात भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. मद्यधुंद डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, धोकादायक वाहतूक व अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पुणे : भरधाव डंपरच्या धडकेने एका सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकात मंगळवारी (ता. २७) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे स्वारगेट परिसरातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

