esakal | एसटीत विसरलेली बॅग सापडली पीएमपीएमएल बसमध्ये । PMPML
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

एसटीत विसरलेली बॅग सापडली पीएमपीएमएल बसमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोसरी : एक महिला शिवाजीनगरवरून संगमनेरकडे जाण्यासाठी एसटीत बसते. मात्र प्रवासी बॅग घरीच विसरल्याने एसटीतून उतरून बॅग घेण्यासाठी घरी जाते. घरीही बॅग नसते. पुन्हा एसटी बसमध्येच बॅग राहिल्याचे लक्षात आल्याने त्या एसटीचा संगमनेरपर्यंत पाठलाग केला जातो. मात्र एसटीत बॅग सापडत नाही. संध्याकाळी विसरलेल्या बॅगेमधील मोबाईलवर संपर्क साधला जातो. मात्र बॅग सापडते भोसरीतील बीरटीएस टर्मिनलमध्ये महिलाही बुचकळ्यात पडते. मात्र मौल्यवन वस्तूसह बॅग मिळाल्याने महिलेच्या आनंदास पारावार राहत नाही.

सुचित्रा सुहास तपकिरे यांना त्यांच्या जावयाने मंगळवारी (ता. २८) शिवाजीनगर एसटी स्थानकात संगमनेरला जाणाऱ्या बसमध्ये बसविले. मात्र बसमध्ये बसल्यानंतर बॅग घरीच विसरल्याचे लक्षात आले. त्या बसमधून उतरून बॅग घेण्यासाठी पुन्हा बाणेरला आल्यावर घरी बॅग नसल्याचे त्यांना दिसले. मात्र बॅग एसटी बसमध्येच असल्याचे त्यांना समजले. त्या बॅगेत मोबाईलसह मौल्यवान वस्तू व कागदपत्रे असल्याने त्यांनी जावयासह संगमनेरच्या एसटीचा पाठलाग केला. संगमनेरच्या अलिकडे ती एसटी दिसल्यावर त्यांनी एसटीत बॅगेची पाहणी केली. मात्र बॅग सापडली नाही.

तेव्हा त्यांनी संध्याकाळी चारच्या सुमारास हरविलेल्या बॅगेतील मोबाईलर संपर्क साधल्यावर तो चक्क भोसरी टर्मिनलमधील वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे यांनी उचलला व त्यांची बॅग सुरक्षित असल्याचे सांगितले. तेव्हा तापकीर याही बुचकळ्यात पडल्या. त्यांनी बॅग बुधवारी (ता. २९) भोसरी बीआरटीएस टर्मिनलमधून स्विकारली व सर्वांचे आभारही मानले.

वाहक व चालकाचा प्रामाणिकपणा

पुणे ते भोसरी दरम्यानच्या बसमध्ये सापडलेली ही बॅग वाहक लक्ष्मण भगवान जायभाये व चालक सत्यवान तानाजी काळे यांनी स्थानक प्रमुख काळुराम लांडगे व विजय आसादे यांच्याकडे जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्द भोसरी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

चोरटाही बॅग विसरला...

संगमनेरच्या एसटीत बसल्यावर तापकीर यांची बॅग चोरट्याने चोरली. तो चोरटा भोसरीत येणाऱ्या पीएमपी बसमध्ये बसला. मात्र चोरटाही बॅग बसमध्येच विसरला. प्रामाणिक बसचे वाहक व चालकांमुळे ती बॅग पुन्हा तापकीर यांना मिळाली.

loading image
go to top