
वाल्हे : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आज सोमवार (दि.16) जुनपासुन शाळा नियमितपणे सुरू होत आहे. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळ दुतर्फा रांगोळीच्या पायघड्या अंथरुन सजविलेल्या घोड्यावर बसवुन पुष्पवृष्टी, औक्षवण करुन विद्यालयातील पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. नवागतांचा हा अनोखा स्वागत सोहळा परिसरामध्ये सर्वत्र रंगला होता.