शिरसगाव काटा येथे कारच्या ; अपघातात महिला ठार तीन जण गंभीर जखमी

तरुणांच्या तत्परतेने जखमींवर उपचार
pune
punesakal

मांडवगण फराटा : भरघाव वेगाने जात असलेल्या कारचा अपघात होऊन एक महिला ठार तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले. निर्वी - इनामगाव रस्त्यावर शिरसगाव काटा ( ता. शिरूर ) येथे हा अपघात झाला. या अपघातात रोहिणी शंकर वाघमारे ( वय - ३५ ) ही महिला जागीच ठार तर मृत महिलेचे पती शंकर बाबासाहेब वाघमारे ( वय - ४० ), मुलगी पूजा शंकर वाघमारे ( वय - १५ ), दादासाहेब पिराजी खुळे ( वय - ३८ ) सर्व जण राहणार खुळे वाडी, ( ता. हवेली जि. पुणे ) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरसगाव काटा (ता शिरूर) येथे काल रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. तरुणांनी मोठ्या धैर्याने तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढल्याने वेळेत उपचार मिळू शकले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निर्वी - इनामगाव रस्त्यावर शिरसगाव काटा येथे भरधाव वेगाने जात असलेल्या चार चाकी वाहनाचा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की रस्ता सोडून कार पूर्णपणे उसाच्या शेतात घुसली होती. हा अपघात घडल्यानंतर नागरिकांना अपघाताची माहिती मिळाली मात्र अपघातग्रस्त वाहन ऊसात दिसून येत नव्हते.

जखमी गाडीत अडकल्याने आवाज येत नव्हता तितक्यात मदतीला आलेल्या तरुणांना मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने व गाडीत जखमी अडकल्याने लोखंडी कटावणीच्या सहाय्याने दरवाजे उघडून तरुणांनी आत अडकलेल्या जखमींची सुटका केली.

या घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिसांनी धाव घेत तातडीने पाहणी केली. या मदतकार्यात पोलीस पाटील शितल गायकवाड .संतोष जाधव, एम. एस. कदम,, वैभव पवार, विकास केदारी, तेजस जाधव, कुलदिप शिंदे, राजकुमार काटे, स्वप्नील काटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या अपघाताची भीषणता इतकी होती की, रस्त्यापासून लांब अंतरावर ऊसात गाडी जाऊन थांबली.मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. या तरुणांनी धाडसाने दाखवलेल्या तत्परतेने तिघांना वेळेत उपचार मिळू शकले असून तरुणांचे कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com