Pune News: पोटात बाळ, उरात धडकी अन् डोळ्यांत अश्रू; सासूरवास झालेली ‘ती’ अनाथ असूनही बनली ‘माहेर’वाशीण
Domestic Abuse Survivor: गरोदरपणात अत्याचार सहन करणाऱ्या स्मिताला पुण्यातील दवाखान्यातून 'माहेर' या संस्थेचा आधार मिळाला. आता ती आणि तिचं बाळ सुरक्षित आहेत.
पुणे : पाच महिन्यांची गरोदर असलेली ‘ती’ वारज्यातील महापालिकेच्या पृथक बराटे दवाखान्यात आली, तपासणी झाली तरी ‘ती’ तिथून जायला तयार नव्हती. ‘तिच्या’साठी तो दवाखाना होता छळापासून सुटण्याचा आशेचा किरण.