

भोर, ता. २१ : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा भोर तालुक्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे. मागील वर्षी ९४.५५ टक्के निकाल लागला होता.
भोर तालुक्यात गेल्या वर्षी बारावीला २ हजार १ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावर्षी १ हजार ९७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तालुक्यातील ७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. याशिवाय व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालही १०० टक्के लागला आहे. यामध्ये राजा रघुनाथराव कनिष्ठ महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्यावसायीक अभ्यासक्रम, श्री शिवाजी सेकंडरी अॅड हायर सेकंडरी स्कूल, अनंतराव थोपटे महाविद्यालय, गर्ल्स ज्यु. कॉलेज आदींचा समावेश आहे.
तालुक्यातील २१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या १ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन श्रेणी मिळवली आहे. ५३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्वाधिक १ हजार २७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे, तर १६२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे- राजा रघुनाथराव विद्यालय व ज्यु. कॉलेज भोर (९५.९७), छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज भोर (९१.४८), शिवाजी विद्यालय व ज्यु. कॉलेज नसरापूर (१००), अनंतराव थोपटे कनिष्ठ महाविद्याल भोर (८४.८७), गर्ल्स ज्यु. कॉलेज भोर (८२.३५), महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला व ज्यु. कॉलेज शिंदेवाडी (८३.८७), न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज संगमनेर (७८.७८), माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेज खानापूर (८३.३३), दिनकरराव धाडवे पाटील ज्यु कॉलेज सारोळे (९८.३६), जिजामाता ज्युनिअर कॉलेज भोर (१००), अमृता विद्यालयम् नसरापूर (१००), काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे (१००), क्रांतिवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव (१००), युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय (१००), राजगड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स (९८.६८), नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव (१००).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.