Pune Accident : लोणी काळभोर परिसरात दुचाकी अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू
Pune Solapur road accident pedestrian death : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शोध सुरू आहे.
पुणे : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात घडली. अपघातानंतर चालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.